आमदार संजय शिरसाट यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली आहे
आमदार संजय शिरसाट यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली आहे, याबाबतची माहिती लिलावती रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जलील पारकर यांनी दिली.
संजय शिरसाटांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देताना डॉ. जलील म्हणाले, शिरसाटांना रुग्णालयात दाखल केलं असता, सर्वप्रथम त्यांना स्थिर करण्यात आलं. त्यांच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण केल्या आणि अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओग्राफी करत असताना त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी (ब्लॉकेज) आढळली आहे. डॉ. नितीन गोखले यांनी अँजिओप्लास्टी केली आहे.
Edited By-Ratnadeep Ranshoor