मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :अंबरनाथ , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:41 IST)

बिबट्याच्या डोक्यात अडकली बाटली

leapord
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील गोरेगावमध्ये बिबट्याचे पिल्लू सुमारे एक वर्षाचे असून ते रविवारी रात्री गोरेगाव परिसरात पाणी पिण्यासाठी आले होते. मात्र यावेळी त्याचे डोके कॅनमध्ये अडकले. तर एका पर्यटकाला पिल्लू तसेच फिरत असतानाच दिसले. त्यामुळे त्याने त्याचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओच्या आधारे रविवारी रात्रीपासून पिल्लाचा शोध सुरू आहे. बाटली डोक्यात अडकल्याने पिल्लाला काहीही खाणे अशक्य झाले आहे. यामुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे.
 
वन अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि प्राणी कल्याणकारी संस्थांची एक मोठी टीम बिबट्याच्या पिल्लाचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी पिल्लू सापडले नाही. रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्याने ते उपाशी आणि तहानलेले असणार आहे. अशा परिस्थितीत तो लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.