सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:38 IST)

सहा वाहनांच्या अपघातात चार जणांचा मृत्यू

accident
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी (मंगळवारी) साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. यामध्ये सहा वाहनांची विचित्रपणे एकमेकांना धडक बसली. या अपघातात एकूण आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.  
 
सुरुवातीला MH 46 AR 3877 या कंटेनरने पुढे जाणाऱ्या MH13 BN 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे ही कार पुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. या धडकेमुळे टेम्पो हा त्याच्यापुढे असणाऱ्या कारवर जाऊन आदळला. तर ही कार समोरच्या कंटेनरला धडकली. ही सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने मोठा अपघात झाला. यावेळी एक कार दोन कंटेनरच्या मधोमध अडकल्याने त्यामधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.