1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:34 IST)

बाप्परे, 14 वर्षे बोगस डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या सुनील वाडकरला पोलीस कोठडी

doctor
एमबीबीएसची डिग्री नसतानाही 14 वर्षे वसई विरार नालासोपारा शहरात अत्याधुनिक रुग्णालय उभारून, नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या बोगस डॉक्टर सुनील वाडकरला पुन्हा तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
सुनील वाडकर याने त्याच्या दंत चिकित्सक डॉक्टर पत्नीच्या नावाने वसई विरार महापालिकेत आरोग्य कर्मचारी पुरवण्याचा ठेका घेऊन, तब्बल 7 वर्षे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सांभाळले आहे. 2013 मध्ये आपले बिंग फुटू नये यासाठी तो पालिका आरोग्य विभागातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने विरार महामार्गावर हायवे आणि नालासोपा-यात नोबेल असे दोन अत्याधुनिक रुग्णालय उभे केले होते. त्याच्यावर दुसरा नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु सव्वा महिन्या पासून वाडकर हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता. रविवार रात्री 8 ते 9 च्या सुमारास तुलिंज पोलिसांना सापळा रचून त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 14 वर्षे बोगस डॉक्टर सपलहल म्हणून काम करणाऱ्या  सुनील वाडकरला पोलीस कोठडी
एमबीबीएसची डिग्री नसतानाही 14 वर्षे वसई विरार नालासोपारा शहरात अत्याधुनिक रुग्णालय उभारून, नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या बोगस डॉक्टर सुनील वाडकरला पुन्हा तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
सुनील वाडकर याने त्याच्या दंत चिकित्सक डॉक्टर पत्नीच्या नावाने वसई विरार महापालिकेत आरोग्य कर्मचारी पुरवण्याचा ठेका घेऊन, तब्बल 7 वर्षे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सांभाळले आहे. 2013 मध्ये आपले बिंग फुटू नये यासाठी तो पालिका आरोग्य विभागातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने विरार महामार्गावर हायवे आणि नालासोपा-यात नोबेल असे दोन अत्याधुनिक रुग्णालय उभे केले होते. त्याच्यावर दुसरा नालासोपारा तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु सव्वा महिन्या पासून वाडकर हा पोलिसांना गुंगारा देत फरार होता. रविवार रात्री 8 ते 9 च्या सुमारास तुलिंज पोलिसांना सापळा रचून त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 18 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.