मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (21:04 IST)

हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठीविद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
 
विकास फाटक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ याला  वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ऑफलाइन बोर्ड परीक्षांना विरोध करण्यासाठी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी त्याला १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.