बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:55 IST)

अभ्यासाच्या तणावातून तरुणीची आत्महत्या

suicide
औरंगाबाद : उषा कृष्णाचंद्र चौधरी (१८ रा. शंभूनगर) असे बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचे नाव असून तिने परीक्षेच्या तणावातून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.३) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.  
 
उषा ही देवनागरी परिसरातील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. दरम्यान उषाला एमबीबीएस करायचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. दरम्यान शुक्रवारी (ता.३) वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला अभ्यास करण्यासाठी पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले. आई पेपर आणण्यासाठी गेली असता उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.