शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (20:57 IST)

5 ते 6 तासांनंतर जिओ नेटवर्क अखेर हळूहळू पूर्वपदावर

अखेर 5 ते 6 तासांपासून डाऊन असलेलं जिओ नेटवर्क अखेर हळूहळू पूर्वपदावर आले आहे. दुपारपासून जिओच्या नेटवर्कची समस्या अनेक ग्राहकांना होत होती. त्यामुळे फोन आणि इंटरनेट वापरण्यासाठी अनेक अडथळे येत होते.  दुपारपासून मुंबईसह उपनगरातील जिओचं नेटवर्क गेल्यानं अनेकांचे हाल झाले. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये जिओचं नेटवर्क सुरळीत सुरू झालं आहे. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान नेटवर्क बंद होतं.  
 
दरम्यान, जिओचं नेटवर्क डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.