बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:54 IST)

डॉ सुवर्णा वाजे खून प्रकरण; पती संदीप वाजेला ७ दिवसाची पोलिस कोठडी

नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा वाजे यांच्या हत्येतील मुख्य संशयित पती संदीप वाजे याला गुरुवारी अटक केल्यानंतर आज इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक माहिती आणि गुन्हा कसा घडला याबाबत अधिक माहिती पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण, न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून जयदेव रिखे यांनी काम बघितले.
 
या घटनेत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी डॅा. वाजे यांचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह गाडी जाळून टाकली होती. याबाबत सविस्तर चौकशी आणि डीएनए अहवाल यावरून पती संदीप वाजे याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. पूर्वनियोजित कट रचून डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी हा खून केला.