मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (15:30 IST)

मॉकड्रील दरम्यान झालेल्या अपघातात जखमी अग्निशमन जवान सदाशिव कर्वे यांचे निधन

Firefighter Sadashiv Karve died in an accident during a mock drill
मुंबईतील माटुंगा पूर्वेकडील डॉ. भाऊ दाजी लाड मार्गावरील साईसिद्धी इमारतीत मॉकड्रील दरम्यान विचित्र अपघातात जखमी झालेल्या अग्निशमन जवानाची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्यावर सहा दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
अग्निशमन दलाकडून माटुंगा येथील साई सिद्धी या इमारतीत मॉक ड्रील सुरू असताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे सदाशिव धोंडिबा कर्वे, चंचल भीमराव पगारे व निवृत्ती सखाराम इंगवले हे तिघेजण जखमी झाले होते. यावेळी त्यांना तातडीने नजीकच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर त्यांच्यावर सहा दिवसांपासून शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्वे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र उपचारादरम्यान आज अग्निशमन दलाचे सदाशिव धोंडिबा कर्वे यांचे निधन झाले आहे.
 
सदाशिव धोंडीबा कार्वे (वय ५५) वडाळा येथील अग्निशमन केंद्रात यंत्रसंचालक होते. कार्वे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.
 
मुंबईतील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर सातारा येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.