विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही : आदित्य ठाकरे
मुंबईचं शाश्वत विकास करणारे बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या बजेटमधून नैराश्य दिसले. तसे हे बजेट नाही. हे बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे. विरोधक केवळ टीका करत आहेत. विरोधक टीका करतात, कारण तसे व्हिजन त्यांच्याकडे नाही, असा हल्लाबोल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या सत्ताकाळात काहीही झालेले नाही. विकास कुठे आहे, असा विरोधकांनी प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचे बजेट आहे. महिलांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ग्रीन फायनान्स आहे. पर्यावरणासाठी आहेत. 'पुढे चला मुंबई' हा नारा घेऊन पुढे जायचे आहे. मुंबईचे मुख्यमंत्री असल्याने मुंबईसाठी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. त्या बजेटमध्ये दिसत आहेत. मुंबईचं शाश्वत विकास करणारं बजेट आहे. मुंबईचे सर्व पैलू या बजेटमध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामधून नैराश्य दिसले तसे हे बजेट नाही. हे बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरज लक्षात घेऊन बजेट बनवले आहे असे सांगितले.