मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:46 IST)

पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेसचा राडा

congress-bjp
पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर स्थानकाजवळ भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
 
या संदर्भात मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. 
 
काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा वसंत स्मृतीच्या दिशेने येत असल्याचे कळताच मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी एकटवले. मात्र, पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वसंत स्मृतीपासून काही अंतरावर रोखले. पोलिसांनी काहीवेळापूर्वीच आमदार झिशान सिद्दिकी आणि मंगलप्रभात लोढा यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अजूनही या परिसरात तणाव आहे.