मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (17:47 IST)

काँग्रेसने दुसऱ्या टप्प्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

Priyanka Gandhi
यूपी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली ज्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा, गुलाम नबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि दीपेंद्र हुडा यांच्या नावांचा समावेश आहे.
 
दुसऱ्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजय कुमार लल्लू, आराधना मिश्रा, भूपिंदर सिंग हुड्डा, भूपेश बघेल, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, अभिनेते राज बब्बर, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, राजीव शुक्ला, यांचा समावेश आहे. तसेच माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, आचार्य प्रमोद कृष्णम, रशीद अल्वी, जफर अली नक्वी, कुलदीप बिश्नोई, वर्षा गायकवाड, हार्दिक पटेल, सुप्रिया श्रीनेट, इम्रान प्रतापगढ़ी, कन्हैया कुमार, परिणीती शिंदे, धीरज गुर्जर आणि तारिक अन्वर यांचा समावेश आहे.