सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (08:56 IST)

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे खा. नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पर्यंत लाऊडस्पिकर लावून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह १४ कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ३६ दिवसांनी अमरावतीत परतलेल्या राणा दाम्पत्याचं शनिवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार घातला. मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. हा स्वागता कार्यक्रम रात्री उशीरापर्यंत सुरु होता. रात्री दहानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नसतांना देखील लाऊड स्पीकर सुरु ठेवण्यात आले. घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केला होता. यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.