1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. A case has been registered against seven persons in the Chalisgaon firing case

चाळीसगावला गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

येथील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावरील झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींनी वापरलेली कार बेवारस सापडली आहे. कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरात घडली होती. त्यात बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
 
चाळीसगाव शहराला दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकामी स्वतः पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे स्टाफसह रवाना झाले आहे. आरोपी व आरोपींनी वापरलेली कार यांचा शोध घेत असताना ती सायगव्हाण (नागद-कन्नड रस्त्यावर) बेवारस मिळून आली आहे. आरोपी परिसरात लपलेले असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील रिसॉर्ट तसेच कन्नड गावामधील लॉजेसची तपासणी सुरु केली आहे. यासोबतच चाळीसगाव शहरात आरोपीच्या शोधकामी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 
पुढील लेख
काळीज पिळवटून टाकणारी घटना : परीक्षेला जाताना भीषण अपघात; तिघे बहिण-भाऊ जागीच ठार