बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:31 IST)

नाशिक शहरातील वाहतूक मार्गात ‘या’ दिवशी महत्वाचे बदल !

traffic
नाशिक : उपनगर येथील बाल येशू यात्रेनिमित्त गर्दी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. १० व ११ फेब्रुवारीला हा बदल राहणार आहे.
 
पुणे – सिन्नरच्या दिशेकडून द्वारकाहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बिटको चौक – देवळाली गाव – विहीतगाव – वडनेर गेट व तेथून पाथर्डी फाटा मार्गे जातील. पुणे, सिन्नर बाजूकडून येणारी द्वारका सर्कल व धुळेकडे जाणारी वाहने सिन्नर फाटा, बिटको चौक, जेल रोड, नांदूर नाका, जत्रा चौफुलीमार्गे धुळ्याकडे जातील.
 
द्वारका सर्कल बाजूकडून सिन्नर, पुणेकडे जाणारी अवजड वाहने द्वारकाकडून काठे गल्ली सिग्नल, फेम सिनेमा डावीकडे वळून ड्रीम सिटी, नारायण बापूनगर, सैलानी बाबा चौक, जेल रोड मार्गे सिन्नर, पुण्याकडे जातील व येतील.
 
सदरचा वाहतूक मार्गातील बदल १० ते ११ फेब्रुवारीदरम्यान सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत या वाहतूक मार्गातील बदल राहणार आहेत. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor