1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 15 एप्रिल 2024 (12:49 IST)

जत्रेत विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू!

Toddler dies of electric shock at Pune fair Nine-year-old boy dies of electric shock at Katraj fair in Pune
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ही घटना पुण्यातील एक जत्रेमध्ये घडली असून जत्रेमध्ये विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाशपाळण्यामध्ये बसतांना या चिमुकल्याला विजेचा धक्का बसला व त्याचा मृत्यू झाला आहे.  
 
पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वे लोक सुन्न झाले आहेत. जत्रा म्हणटली की लहान मुले आनंदाने नाचायला लागतात. त्यांना मोठा आनंद होतो. व हा आनंद अजून मोठा करण्यासाठी पालक आपल्या मुलांना जत्रेमध्ये नेतात. पण याच जत्रेमध्ये दुःखद घाटाना देखील घडू शकतात. तशीच घाटना पुण्यातील जत्रमध्ये घडली असून कुटुंबावर आनंद ऐवजी दुःख व्यक्त करण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कात्रजमध्ये ही जत्रा भरली होती. पुण्यात फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने फनफेअर भरवण्यात आली आहे.   
 
या जत्रेमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाचा आकाशपाळण्यामध्ये बसतांना लोखंडी जाळीला स्पर्श झाला. त्या जाळीमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता व हे नऊ वर्षीय गणेश पवारला माहित न्हवते, त्याने त्या जाळीला स्पर्श करताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला असून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉकटरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये आकाशपाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे. 

Edited By- Dhanashri Naik