बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (16:51 IST)

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

बीड शहरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. दरक्शा खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली. बीडच्या झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन कुरेशी यांची मुलगी दरक्शा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खेळता खेळता पडली आणि तिचा मृत्यू झाला. बीड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून तिची नोंद केली आहे.

रईसोद्दीन कुरेशी हे झमझम कॉलोनीत भाड्याने राहतात. सकाळी साडेनऊच्या सुमारास दरक्शा खेळताना तिचा तोल गेल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit