1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (20:43 IST)

बाप्परे, आधार तीर्थ आश्रमामध्ये लहान मुलाचा गळा दाबून हत्या

murder
नाशिकच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधार तीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  त्रंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधार तीर्थ आश्रम आहे. या आश्रमात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. मात्र या आश्रमातील एका चिमुकल्याची अशाप्रकारे हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटना उघडकीस येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आलीये. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातच एका चार वर्षाच्या मुलाची गळा अावळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लहान मुलाच्या संशयास्पद मृत्यूची बातमी मिळताच पोलिस घटनास्थळीदाखळ झाले होते. पोलिसांच्या तपासानंतर या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 
 
मृत चिमुकला अवघ्या चार वर्षांचा असून तो उल्हासनगर येथील होता. त्याचा माेठा भाऊ देखिल याच आश्रमात हाेता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, नववीतील एका मुलाचे या लहान मुलाचे भांडण झाले हाेते त्यातूनच ही हत्या झाली का याचा तपास आता केला जात आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री ही घटना घडली. 
नववीच्या वर्गातील एका मुलाशी हत्या झालेल्या मुलाचे भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या हत्येचा भांडणाशी काही संबंध आहे का ? याची देखील कसून चौकशी सुरु आहे. दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले होते ही माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. 
Edited by : Ratnadeep Ranshoor