गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:13 IST)

अमृता फडणवीस यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल

A complaint has been filed in the ED against Amrita Fadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधातच ईडीमध्ये तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीत मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघांचाही उल्लेख आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेतले आणि त्यांची पत्नी काम करत असलेल्या अॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केले. अमृता फडणवीस अॅक्सिक बँकेत उच्च पदावर काम करतात.
 
संबंधित तक्रारदाराने याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.