राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाने आत्महत्या केली असून, नांदेडचे मनसे जिल्हाप्रमुख असणाऱे संभाजी जाधव यांनी गळफास घेतला आहेत. जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आपला पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांना साथ देणाऱ्यांमध्ये संभाजी जाधव हे देखील होते. संभाजी जाधव हे शेतकरी होते. त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते, यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे.
संभाजी जाधव नांदेडच्या डौर गावचे रहिवासी होते. तरोडा नाका परिसरात ते राहत होते. विद्यार्थी काळापासूनच ते राज ठाकरे यांच्या संपर्कात होते.
शेती हा संभाजी जाधव यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य काम होते. मात्र नेहमीच्या दुष्काळामुळे शेतकरी असणाऱ्या संभाजी जाधव यांच्या कर्जाचा बोजा वाढत होता. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी तरोडा नाका परिसरातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला आहे.