शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2019 (15:44 IST)

छिंदमची सुनावणी पूर्ण, छिंदमच्या अपात्रतेच्या ठरवाबाबत लवकरच निर्णय

छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मोठ्या वादात अडकलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्या अपात्रेबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास विभागात सुनावणी पूर्ण झाली असून, नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर ही सुनावणी करण्यात आली आहे. 
 
अहमदनगर मनपाच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर हा ठराव शासनाकडे निर्णयासाठी पाठवण्यात आला. राज्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी घेतली आहे. मागील सुनावणीला छिंदमने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर 22 ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली आहे.
 
महासभेने ठेवलेले सर्व आरोप छिंदमने फेटाळून लावले असून, हे प्रकरण न्यायालयात असून, त्यावर निर्णय झालेला नसल्याचं त्याने सांगितल आहे. छिंदमच्या अपात्रतेच्या ठरवाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. छिंदमच्या गेल्या कार्यकाळात महासभेने अपात्र ठरवण्याचा ठराव घेतला होता. मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा विजय झाला आहे.