शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (11:59 IST)

हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन नांदेडमध्ये एकाचा जागीच मृत्यू , तिघे जखमी

death
कुकर मध्ये कच्ची हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाल्याची घटना नांदेडच्या मुखेड तालुक्यात दापका गुंडोपंत येथे काल घडली. सुनील मारवाड असे या मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
वृत्तानुसार, हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती झाल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. कच्ची हळद कुकरमध्ये शिजवताना कुकर मधून पाणी गळती का होत आहे हे बघण्यासाठी सुनील कुकर जवळ गेला  असता कुकरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की कुकरचे अक्षरश तुकडे होऊन दूरवर जाऊन पडले. या स्फोटात सुनील हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी मुलगा आणि एक अन्य मजूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर डोंगर कोसळले आहे.