मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (07:54 IST)

मालेगाव मधून एनआयएची मोठी कारवाई, एकाला ताब्यात घेतले

arrest
नाशिकच्या  मालेगाव मधून एनआयएने मोठी कारवाई करत  पीएफआयशी संबंधित असलेल्या गुफरान खान सुभान खान यास पहाटेच्या सुमारास मोमीन पुरा भागातून ताब्यात घेत त्याची शहर पोलीस स्थानकात कसून चौकशी करण्यात आली. पीएफआय संघटनेसाठी गोपनीय काम करीत असल्याचा एनआयएला संशय असून, त्याचे केरळपर्यंत संबध असलयाचे बोलले जात आहे.एनआयए पथकाने त्याच्या घराची तीन तासांपेक्षा तास काळ तपासणी केली तर गुफारानची एनआयएने ५ तास चौकशी करून सोडून दिले. मात्र उद्या त्याला एनआयए कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. एनआयएच्या कारवाईने मालेगावात जोरदार खळबळ उडाली आहे. मालेगावात आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पीएफआयशी संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
 
वर्षभरापूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी राष्ट्रीय तपास संस्थेने  सुरु केली होती. त्यावेळेस मालेगावमध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी या ठिकाणी सुध्दा ही छापेमारी केली होती. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयने ही कारवाई केली होती. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे. येथे काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही त्यावेळेस समोर आले होते.
 
एनआयच्या कारवाईबरोबर वर्षभरापूर्वी एटीएसने महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले होते. तर मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल केले होते. यावेळी पीआयएफशी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकाला ताब्यात घेतले आहे.