1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (07:59 IST)

शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष, शैलजा दराडे यांना शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी अटक

arrest
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप असलेल्या शैलजा दराडेंवर यांना पोलिसांनी गुन्हा सिद्ध होताच त्यांना काही वेळापूर्वीच अटक केली असून, उद्या त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष शैलजा दराडे यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात काही वेळेआधी त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्या दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना काही वेळापूर्वी अटक केली आहे. दराडे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor