शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (08:38 IST)

सांगली : अपघातातून लवकर बरे होण्यासाठी चक्क रस्त्यावरच दिला बोकडाचा बळी

सांगली : अपघातातून लवकर बरे व्हावे म्हणून बोकडाचे मुंडके आणि दोन पाय, शिवाय नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असे साहित्य टाकल्याची घटना विटा-कराड राष्ट्रीय महामार्गावर घडले आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी व पुरोगामी सांगली जिल्ह्याला काळी मा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून हा प्रकार करणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की.. विटा कराड राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती चौकापासून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर श्वेता स्टील हे फर्निचर दुकान आहे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका चार चाकी वाहनातून दोन व्यक्ती खाली उतरले. एकाच्या हातात बोकडाचे पिल्लू होते. आणि त्यांनी त्या पिल्लाला खाली पाडून तिथेच त्याच्या मानेवर सूरी फिरवली. त्यावर ते काही क्षण ओरडून निपचित पडले. तसे त्यांचे मुंडके आणि गुडघ्यापासून खालचे पुढचे दोन पाय धडा वेगळे केले आणि एका वर्तमानपत्राच्या कागदावर नारळ, रोट्या, तांदूळ, औषधाच्या गोळ्या, एक अंड, काजळ, पावडर, लिंबू दारूची बाटली असे साहित्य ठेवले. त्यानंतर घटनास्थळातून पळ काढला. ही घटना इतक्या विद्युत वेगाने घडली की शेजारी भांडी घासणाऱ्या एका महिलेला दिसली तशी ती महिला जोरात ओढून अक्षरशः गांगरून गेली आणि जागीच बेशुद्ध पडली. त्या महिलेच्या घरच्यांनी तिला उठवून विचारले असता तिने समोर पाहिलेले दृश्य सांगितले त्यावेळी एखाद्या लहानग्याचा नरबळी दिला की काय? अशी भीती त्या घरातील लोकांना वाटली.
 
याबाबत विवेक भिंगारदेवे यांनी सांगितले की, प्रारंभी आम्हाला हा करणीचा किंवा तत्सम अंधश्रद्धेचा प्रकार वाटला. परंतु आम्ही सकल कशी केली असता असला प्रकार करणाऱ्या दोन व्यक्ती या सरकारी कर्मचाऱ्यांचा अपघात या ठिकाणी झाला होता. त्यातून तो अद्यापही पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे पुन्हा आपला अपघात या ठिकाणी होऊ नये किंवा झालेल्या अपघातातून आपण तात्काळ बरे व्हावे या अंधश्रद्धेपोटी असला प्रकार केल्याची कबुली आपल्याजवळ दिल्याचे भिंगारदेवे यांनी सांगितले. मात्र या अघोरी प्रकारानंतर परिसरा तील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी याप्रकरणी संबंधितांवर अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor