1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (08:11 IST)

आनंदाची बातमी! पुढील 24 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता

monsoon
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला होता यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. तर आता अवकाळी पाऊस संपल्यानंतर काही भागात पारा झपाट्याने वाढला आहे. यामुळे आता सर्वांना मान्सूनची प्रतीक्षा आहे. यामुळे राज्यात मान्सून राज्यात केव्हा दाखल होणार? आहे हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
 
याच दरम्यान एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. आज पर्यंत (ता. 20) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 

Edited By - Ratnadeep ranshoor