शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (08:12 IST)

नाशिकमध्ये गोवंश वाहतुकीच्या संशयावरून मुस्लिम युवकाची जमावाकडून हत्या

muslim boy
प्रवीण ठाकरे
bb
नाशिकच्या इगतपुरीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या करण्यात आलीय, तर एकजण गंभीर जखमी आहे.
 
पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार, राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष म्हणवणारी व्यक्ती या घटनेत मुख्य आरोपी आहे. पप्पू उर्फ प्रदीप गोपाळ आडोळे असं त्याचं नाव आहे.
 
या घटनेत पडघा येथील लुकमान अन्सारी यांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी एकूण 15 ते 16 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 6 जणांना अटक करण्यात आलीय, तर इतरांचा शोध सुरु आहे.
 
या प्रकरणात गोवंश वाहतूक करणारे आणि त्यांना मारहाण करणारे यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.
 
आरोपींपैकी एकाच्या गाडीवर स्वतःचा फोटो आणि राष्ट्रीय बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष असल्याचा उल्लेख असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे, तर अजून एक आरोपी हा बजरंग दलासाठी काम करत होता अशी माहिती आहे.
 
पोलीस निरीक्षक राजू. एस. सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्यांनी वाहन अडवलं त्यांच्याविरोधात सुरुवातीस आयपीसी कलम 341, 326, 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याच घटनेत तिघांमधील एक इसम मृत्यू झाला आहे. त्यामुळे यात 302 च्या कलमाचा अंतर्भाव केलेला आहे. दुसरा गुन्हा, गोवंशाची वाहतूक करण्यासंदर्भातील आहे."
 
"8 तारखेला रात्री आणि 9 तारखेच्या पहाटे गोवंशाच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना आडवल आणि त्यांना मारहाण करण्यात आली. यात आम्ही दोन गुन्हे दाखल केले. एक गुन्हा गोवंशाची वाहतूक करण्यासंदर्भातील आहे, तर दुसरा गुन्हा मारहाण करणाऱ्यांविरोधातील आहे," असंही पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी सांगितलं.
 
नेमकी घटना काय घडली?
8 जून 2023 च्या रात्री 9 वाजता इगतपुरीहून कसाऱ्याकडे गोवंश घेऊन जाणारा टाटा पिकअप ट्रक इगतपुरीतील काही युवकांनी कसाऱ्यात पकडला.
 
तिथे जमावाने ट्रकमधील लोकांना मारहाण केली आणि तो ट्रक त्यांनी इगतपुरीजवळील घाटनदेवी मंदिराजवळ आणत पीक अप ट्रकमधील लुकमान आणि अतिक यांना परत लाकडी दांडे, स्टील रॉडने मारहाण केली.
 
या मारहाणीत लुकमानचे काय झाले कुणाला माहीत नव्हते, तर दुसरीकडे अतिकला घेऊन जमाव इगतपुरी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी जमावाला शांत करत अतिकला दवाखान्यात दाखल करण्यास सांगितलं आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत अवैध गोवंश वाहतूक केली म्हणून अतिक आणि लुकमान विरोधात गुन्हा दाखल केला.
 
मात्र, 10 जून 2023 रोजी लुकमानचा मृतदेह घाटनदेवीजवळ सापडला.
 
Published By -Smita Joshi