महापालिकेकडून 3,269 दुकानांसह आस्थापनांची झडती
मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी तर, मुंबई महापालिकेने दिलेली मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आजपासून (28 नोव्हेंबर) दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांनी झाडाझडती घेण्यास व कारवाईला सुरुवात केली आहे.
आज पहिल्याच दिवशी पालिकेच्या पथकाने 24 वार्डातील 3 हजार 269 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. या भेटीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात 3 हजार 93 पाट्या आढळून आल्या. तर, सर्वोच्च न्यायालय व महापालिकेच्या आदेशाचे, नियमांचे पालन न करणाऱ्या आणि मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या न लावणाऱ्या 176 दुकाने व आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्वात जास्त म्हणजे घाटकोपर परिसरात 18 ठिकाणी, भांडुपमध्ये 14 ठिकाणी, खार-वांद्रे 12 ठिकाणी तर, वडाळा व शिवडी परिसरात सर्वात कमी म्हणजे 4 ते 5 ठिकाणी कारवाई करण्यात आली.
Edited by -Ratnadeep Ranshoor