गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (12:46 IST)

व्हॅलेंटाईनआधी प्रेमी युगुलाचा धक्कादायक शेवट

वर्ध्याच्या आर्वी तालुकात पारडी येथील प्रेमी युगलाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रेमी युगुलाने काही दिवसांपूर्वी घरातून पलायन केले होते. त्यांचे मृतदेह शेतातल्या विहिरीत आढळून आले. हर्षल बाबाराव वाघाडे असे या मयत तरुणाचं नाव आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद गेली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी पारडी गावातील एका तरुणासोबत पळाली असून त्यांचा शोध गेल्या 15 दिवसांपासून घेतला जात होता. त्यांचे मृतदेह कुसुमडोदा शेतातील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळले. या दोघांनी एकमेकांना ओढणीने घट्ट बांधून घेतले होते. दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले त्यामुळे त्यांच्यावर जागीच शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस अधिक  तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit