त्र्यंबकेश्वर जवळील वेळुंजे येथे बिबट्याने घेतला चिमुरड्याचा जीव
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे वेळुंजेतील मळ्यातील निवृत्ती दिवटे, यांचा आर्यन या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत जंगलात ओढून नेले. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंदाज घेत घराच्या दरवाज्यात उभे असलेल्या बाळाला लक्ष केले, सदरची झटपट त्या बालकाच्या छोट्या बहिणीने पहिल्या वर ती जोरात किंचाळली परंतु घरातील माणसे जमा होण्याच्या अगोदर बिबट्या बाळाला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेला.
घरातील माणसांनी गावातील लोकांना कळवले जवळपास अर्धा गाव रात्री पर्यंत बाळाचा शोध घेत होते अखेर रात्री दहा वाजेच्या सुमारास घरापासुन 250 मीटर अंतरावर बाळाचा मृतदेह सापडला. घटना घडल्या नंतर दीड तासा नंतर वनविभाग यंत्रणा घटनास्थळी पोहचली. या भागात वारंवार बिबट्याची दहशत असून वनविभाग सतत याकडे कानाडोळा करत आहे. भागातील लोकांनी तक्रार करून देखील वनविभाग अजून मात्र झोपेतच आहे काय ? असा सवाल उपस्थितीत होतो आहे. याच परिसरातील धुमोडी येथेही मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने एका बालिकेचा बळी घेतला होता, तेव्हाही पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थां कडून होत होती. वनविभागाने ग्रामस्थांचे न ऐकल्याने आज पुन्हा एक बळी गेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज सदर बालकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
वारंवार या बघात बिबट्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर, बालकांवर हल्ले चालवले आहे. शेतकऱ्यांना रात्रीबेरात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. या घटनेने संपूर्ण गाव दहशती खाली आले आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा.
समाधान बोडके, शिवसेना नेते
Edited By - Ratnadeep Ranshoor