1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Gajanan Kirtikar from the Thackeray group joins the Shinde group

ठाकरे गटातील गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेने नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार समारंभात रवींद्र नाट्य मंदिर येथे गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. शिवसेनेतील ठाकरे गटातील खासदारांची गळती सुरु आहे आता ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली असून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

गजानन कीर्तिकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास स्थानी वर्षा येथे त्यांची भेट घेतली.कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री रवींद्र नाट्य मंदिराकडे निघाले. माहीम विभागाचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार समारंभ रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आला.या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी विजय शिवतारे, शीतल म्हात्रे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात खासदार गजानन कीर्तिकरांनी प्रवेश केला. या पूर्वी गजानन कीर्तिकर आणि मुख्यमंत्री यांची भेट झाल्याने कीर्तिकर शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. आता त्या चर्चांना पूर्णविराम आला आहे. 
 
काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. त्यात ठाकरे गटाच्या खासदाराने पक्ष सोडणे हे धक्कादायक आहे. 
 
Edited  By - Priya Dixit 
 
पुढील लेख
बस अपघात ! पुण्यातील शाळेची बस रायगड दरीत कोसळली ,15 विद्यार्थी जखमी