1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (18:24 IST)

Rain Update : या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

rain
देशात थंडीची लाट येत असताना श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ दक्षिण -पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असताना देशातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 48 तासात काही राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट मते, आंध्रप्रदेश किनारपट्टी आणि तमिळनाडू येथे हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात थंडीचा जोर वाढणार असून नागरिकांनी थंडीची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. रायलसीमा आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टी जवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे काही राज्यात पाऊस कोसळत आहे. 
 
 Edited  By - Priya Dixit