भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे धावणार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुबंईत चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या अनुयायींची गर्दी असते. हे लक्षात घेता मध्य रेल्वे कडून 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान 16 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहे. नागपूर ते मुंबई 3 गाड्या , मुंबई ते नागपूर 5 गाड्या आणि मुंबई ते सेवाग्राम 1 गाडी धावणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई विशेष गाडी नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी रात्री 11:55 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता सीएसएमटी पोहोचेल. तसेच नागपूर ते मुंबई अनारक्षित विशेष गाडी 5 डिसेंबर रोजी नागपुरातून सुटणार असून त्याच दिवशी रात्री 11:45 वाजता मुंबई पोहोचेल.
नागपूर येथून विशेष गाडी क्रमांक 01266 5 डिसेंबर रोजी दुपारी 3:50वाजता निघणार असून ही गाडी 6 डिसेंबर रोजी मुंबईला सकाळी 10:55 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांचा थांबा वर्धा, अजनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, कसारा, मलकापूर, जलम्ब, जळगाव, मनमाड, भुसावळ, चाळीसगाव, इगतपुरी, नाशिक रोड, दादर, कल्याण या स्थानकावर असेल. तर 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान मुंबई ते नागपूर, सेवाग्राम, अजनी या स्थानकावर 6 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहे.
Edited by - Priya Dixit