गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (09:05 IST)

पंढरपुरात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेचा पेपर लिहिताना मृत्यू

death
पंढरपुरात इयत्ता तिसरीत विद्यार्थिनीचा परीक्षेचा पेपर लिहिताना दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अनन्या भादुले(9) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार अरिहंत इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी  अनन्या गेल्या दोन दिवसांपासून आजारी होती. दररोज प्रमाणे गुरुवारी ती सकाळी पेपर देण्यासाठी शाळेत गेली. पेपर लिहिताना तिला झटका आला आणि ती खाली कोसळली. तिला तातडीनं शिक्षकांनी रुग्णालयात नेले. त्यापूर्वीच त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे शाळेत आणि परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
Edited By - Priya Dixit