रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (13:56 IST)

पंढरपूर निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात, 1 ठार 35 जखमी

accident
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाल्यामुळे 1 ठार तर 35 जण जखमी झाल्याची घटना मंगळवेढ्यातील येद्राव फाटा जवळ झाली आहे. विजापूरहून ही  बस पंढरपूरकडे निघाली होती. बस बालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बस पालटली आणि हा अपघात झाला. या अपघातात  1 जण जागीच  ठार होऊन 35 जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
Edited By- Priya Dixit