मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (09:21 IST)

धैर्यशील मानेंना कर्नाटक पोलिसांची बेळगावात प्रवेशबंदी, आंतरराज्य सीमेला आले छावणीचे स्वरूप

सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावला जाणार होते. याबाबत माहिती कळताच कर्नाटकाने ताबडतोब त्यांना बेळगाव प्रवेशबंदी लागू केली. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.
सीमा भागामध्ये १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. माने हे बेळगावला जाणार होते
तरीही माने हे बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी नाका परिसरात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Published - By- Priya Dixit