शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (13:27 IST)

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

accident
पंढरपूर जवळ एक फॉर्च्युनर कार अपघात ग्रस्त होऊन 50 फूट खोल कालव्यात कोसळली या अपघातात ज्येष्ठ आणि रसिद्ध लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले. तर तीन जखमी झाले आहेत. 
 
पंढरपूर कुर्डुवाडी रस्ताच्या चौपदीकरणाचं काम सुरु असल्यामुळे या पुलावर नेहमी अपघात घडतात. रात्रीच्या वेळी या अरुंद पुलावरून जात असता कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली. या अपघातात लावणी कलावंत यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची कन्या, नातं, आणि वाहन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची कार ज्या कालव्यात पडली त्या ठिकाणी उतरायला जागा नाही. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले. रुग्णवाहिका बोलावून तातडीने दोऱ्याच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. 

Edited By- Priya Dixit