मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (18:06 IST)

मुंबईत बेस्टबसला भीषण आग, सुदैवाने मोठाअनर्थ टळला

मुंबईच्या भायखळा येथे एका बेस्टच्या बसने अचानक पेट घेतला. जे.जे. उड्डाणपूल भायखळा जवळ ही घटना घडली असून सुदैवाने या बस मध्ये एकही प्रवाशी नव्हते. बस मध्ये चालक आणि वाहक हे दोघेच होते. त्यांनी बसमधून बाहेर पडल्यामुळे ते दोघेही बचावले. ही बस सांताक्रूझ आगाराची होती. ही बस शनिवारी सकाळी 8:20 वाजेच्या सुमारास जे.जे .उड्डाणपुलाजवळ पोहोचली असता.तिने अचानक पेट घेतला.    

आग कशा मुळे लागली हे कारण अद्याप समजू शकले नाही.आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. 
आग लागल्याची घटना अग्निशमन दलाला देण्यात आली असून अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या अग्निकांडात बसपूर्णपणे जळाली आहे. पोलीस तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit