सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2024 (10:53 IST)

वीज बिल 570 रुपये आले म्हणून महिला टेक्नीशियनची केली हत्या

murder
बारामती- महाराष्ट्रातील बारामती मध्ये एक भयंकर कृत्य घडले आहे. वीज बिल मध्ये सुधारणा केली नाही म्हणून एका व्यक्तीने महावितरणच्या एक महिलेची हत्या केली आहे. या घटने नंतर महावितरण विभागाला धक्का बसला आहे. या घटनेची माहित मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 
 
घडले असे की, बारामती मध्ये एका व्यक्तीने महावितरण विभागामध्ये जाऊन बिल जास्त आल्याची तक्रार केली, वीज बिल हे 570 रुपये आले होते. जास्त बिल आल्यामुळे तो व्यक्ती नाराज झाला. एवढे बिल कसे आले म्हणून त्याने विचारपूस केली व यामध्ये सुधारणा करून द्या असे तो म्हणाला पण त्याला सुधारणा करून मिळाली नसल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने रागाच्या भरात महावितरण विभागामधील महिला कर्मचारी वर धारदार शस्त्राने वर केलेत त्याने 16 वर त्या महिलेवर केलेत यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला 34 वर्षाची असून तिचे रिंकू नाव आहे. रिंकू ही गेल्या दहा वर्षांपासून महावितरण विभागामध्ये कार्यरत होत्या. रिंकू या ऑफीस मध्ये एकट्याच होत्या. हा आरोपी अनेक दिवसांपासून वीज बिल जास्त येत आहे म्हणून तक्रार करीत होता. वीज बिलामध्ये सुधारणा करून मिळाली नाही म्हणून या आरोपीने या कर्मचारी महिलेची धारदार कोयत्याने 16 वार करून हत्या केली असून यामध्ये महिला कर्मचारीच मृत्यू झाला आहे.  
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी वीज बिल जास्त येते म्हणून रिंकू यांच्याशी वाद घालायचा. यादरम्यान राग अनावर झाल्याने त्याने हल्ला केला. त्यानंतर रिंकू यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर महावितरण विभागाने स्पष्टीकरण दिले की, ज्या बिलाला घेऊन आरोपीने महिलेची हत्या केली त्या बिलामध्ये काहीच गडबड नव्हती आरोपीने 63 युनिट वीज वापरली होती ज्याचे बिल 570 रुपये झाले होते. ज्यामुळे हे बिल आले होते. जे वीज उपयोग नुसार योग्य बिल आहे. 

Edited By- Dhanashri Naik