शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (10:17 IST)

महाराष्ट्राच्या जंगलात झाडाला बांधलेली महिलेला, गोव्यात उपचारासाठी दाखल केले

types of forest in india
मुंबई: महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शनिवारी सोनारली येथील घनदाट जंगलात झाडाला बांधलेल्या 50 वर्षीय महिलेची यूएस पासपोर्ट आणि आधार कार्डच्या छायाप्रतीसह सुटका केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार महिलेला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व आता नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे.
 
सावंतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमोल चव्हाण म्हणाले की , “आम्हाला ती महिला सापडली तेव्हा ती खूप डिहायड्रेशन झाली होती. असे वाटत होते की ती कदाचित किमान 48 तास तिथे अडकली असेल. तिला बोलताही येत नव्हते, पण ती प्रतिसाद देत होती.
 
पोलिसांना महिलेकडून एक बॅग आणि लॅपटॉपही सापडला. या महिलेचा आरडाओरडा एका मेंढपाळाने ऐकला व पोलिसांना माहिती दिली.
 
या महिलेच्या पायाला कुलूप असलेल्या झाडाला बेड्या ठोकल्या होत्या, त्यामुळे पोलिसांना आधी झाड तोडावे लागले आणि नंतर कुलूप तोडावे लागल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्गच्या बांदा पोलिस स्टेशनने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.