मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (12:50 IST)

नाशिकात साकारली 450 किलोच्या वजनाची विश्वविक्रमी मुद्रा, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ते नाशिकात संभाजी महाराज पुतळ्याजवळ तब्बल 450 किलो वजनी 16 फूट उंच आणि 12 फूट रुंद अशी भव्य विश्वविक्रमी मुद्रा कलाकृती साकारण्यात आली. नाशिकतील संभाजी महाराज मंडळाने साकारलेल्या या भव्य दिव्य कलाकृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. ही संकल्पना मंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांची असून आनंद सोनावणे यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही पहिली भव्य दिव्य मुद्रा असल्याचे सांगितले जात आहे. या भव्य दिव्य विश्वविक्रमी कलाकृती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, त्यांची मुद्रा, सोनेरी इतिहास सर्वत्र पोहोचण्याच्या उद्धेशाने साकारण्यात आली आहे.

तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी हे उध्दिष्टये ठेवून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ते भव्य विश्वविक्रमी मुद्रा साकारण्यात आली आहे. ही मुद्रा 16 फूट उंच असून 12 फूट रुंद असून 450 किलो वजनी आहे. ही मुद्रा बनविण्यासाठी फायबर आणि लोखंड वापरण्यात आले आहे. या भव्य मुद्रेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवण्यात आली आहे.