बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (13:27 IST)

तृतीय पंथीय मुलीशी करणार विवाह बीडचा तरुण

समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची किंवा नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा म्हणून बीडमधील एक तरुणाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. बाळू नावाचा हा तरुण शहरातील किन्नर सपनाशी विवाहबद्ध होणार आहे. 
 
मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री आहे. या दोघांनी पुढील आयुष्यादेखील सोबत घालावायचं असा निर्णय घेतला आहे. लवकरच हे दोघेही विधिवत लग्न  करणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त बाळू आणि सपना हे दोघेही लग्न करणार आहे.
 
बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशात त्याची ओळख सपनाशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर याचे रूपांतर प्रेमात झालं. आता दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या विवाहानंतर हे असे मराठवाड्यातील पहिला विवाह ठरणार आहे. याआधी मनमाड येथे किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते.