शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (08:07 IST)

तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून

murder
तासगावातील इंदिरानगर येथे एका वीस वर्षे तरुणाचा चाकूने पाच वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
घरातील एक वस्तू घेऊन गेलेचा राग मना धरून सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे- २० रा.इंदिरानगर, तासगाव या तरुणाचा चाकूने पाच वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. सुरज उर्फ लल्यावर गळ्याजवळ खांद्याच्या मागे डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौकांची नावे निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत. सुरज उर्फ लल्यावर दोन गंभीर वार झाल्याने व अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor