सांगलीत हॉस्पिटलमधून अपहरण झालेले बाळ सापडले
तासगाव येथील डॉ.अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून रविवारी सकाळी अपहरण झालेले एक दिवसाचे बाळ अखेर सापडले आहे. हॉस्पिटलमधील एका नर्सने हे बाळ पळवले होते. दोनच दिवसांपूर्वी ही नर्स हॉस्पिटलमध्ये रुजू झाली होती. अपहरणाची सर्व हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बाळासह आरोपी महिलेला शेणोली स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. बाळ सुखरुप आहे. एलसीबी, विटा व तासगावच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली. अवघ्या 8-9 तासात बाळाचा शोध घेत आरोपीला अटक केले. आरोपी महिलेने हे कृत्य का केले याची पोलीस चौकशी करत आहेत