पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन उडी मारून स्टंट करणारा तरुण बेपत्ता
सध्या राज्यात मुसळधार पावसाचा जोर सुरु आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाल्यात पूर आले आहेत. सध्या नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून कळवण, बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. मालेगावात गिरणानदीला पूर आला आहे मालेगावात नाशिक येथे गिरणानदीच्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणे एका युवकाच्या अंगाशी आले आहेत. या तरुणाने पूर आलेल्या गिरणानदीत उडी घेतली आणि आता हा तरुण बेपत्ता झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या तरुणाचा शोध घेतला असून अद्याप तो सापडला नाही. गिरण नदीच्या पुलावरून तरुणाने उडी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाचे नाव नईम अमीन असून तो मालेगावात राहत असल्याचे समजले आहेत. रात्री अंधार झाल्यामुळे त्याचा शोध लावता आला नाही. सकाळी त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु झाले असून अद्याप तो सापडला नाही.
हा तरुण उडी मारल्यावर बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप शोध लागला नाही. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पूर्वी देखील अनेकांनी पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करत आपला जीव गमावला आहे.