शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (11:40 IST)

मुंबईच्या धावत्या लोकल मध्ये तरुणीचा विनयभंग

rape
आज जरी मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तरीही त्यांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण होतात. देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबईत महिला असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.काही दिवसांपासून लोकल मध्ये महिलालांना त्रास देणे, अश्लील चाळे  करणे आणि अश्लील बोलून महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडत आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोड जवळ धावत्या लोकलमध्ये एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीच्या तक्रारी वरून तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोड जवळ एका धावणाऱ्या लोकल मधील आहे. मालाड येथे राहणारी एक 24 वर्षीय तरुणी रात्री चर्नी रोड ला प्रवास करत असताना लोकल मध्ये एका तरुणाने तिची छेड काढत अश्लील चाळे करून अश्लील वक्तव्य करत होता. तरुणीने आरडाओरड केल्यामुळे तरुणाने लोकलचा वेग कमी झाल्यावर रेल्वेतून उडी मारून पसार झाला. तरुणीने तरुणाच्या विरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्या तरुणाचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit