बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2024 (09:27 IST)

जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना माळशिरसचा युवक ठार

मराठा युवक हनुमंत रणनवरे (वय ४८) यांचे बीडजवळ अपघाती निधन झाले असून त्याच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
 
हनुमंत रणनावरे हे शनिवारी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्या समवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते. मनोज जरांगे पाटील यांची महासंवाद सभा संपल्यानंतर हनुमंत रणनवरे हे आपल्या मित्रासह दुचाकीवरून घराकडे परत येत असताना बीडजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ते जागीच ठार झाले आहेत त्यांचे सहकारी मित्र मोहन मुरलीधर रणनवरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी समजतात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शोक व्यक्त केला असून त्यांचे पार्थिव माणकी (ता माळशिरस जि सोलापूर) कडे शवविच्छेदनानंतर रवाना केले जाणार आहे.
हनुमंत रणनवरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor