गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Updated : गुरूवार, 14 मार्च 2024 (13:37 IST)

जरांगेंना धक्का: पोलिसांची मोठी कारवाई!

Manoj Jarange
Hingoli-  मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासाठी  आता राज्यभरात दौरा करत आहे. तसेच हिंगोलीच्या वसमत ग्रामीण पोलीस ठाणे आणि वसमत शहर पोलीस ठाणे अशा दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला आहे. व 80 ते 90 जणांवर त्यांच्यासह  गुन्हे दाखल केले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्यासह 80 ते 90 जणांविरोधात गुन्हे हिंगोलीच्या वसमत इथं दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील हे मंगळवारी हिंगोलीतील वसमत इथं मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवाना मोटरसायकल रॅली काढणे, विनापरवाना लाऊड स्पीकर लावणे याबद्द्ल हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मराठा आरक्षण बाबतीत राज्यसरकारने नेमलेल्या न्यायमुर्ती संदीप शिंदे समितीचा कालावधी वाढवला आहे. तसेच शिंदे समितीची स्थापना 7 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. व यात मुदतवाढ करून आता शिंदे समितीला 30 एप्रिल 2024 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर 2023 रोजी महायुतीच्या सरकारने या शिंदे समितीची स्थापना केली होती. समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित  करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. 

Edited By- Dhanashri Naik