गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (11:52 IST)

मनोज जरांगेंचं पुन्हा मोठं विधान

maratha aarakshan manoj
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य....गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचंय; सध्या बीडचा दौरा मनोज जरांगे पाटील करत आहेत. तसेच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. तसेच नरेंद्र मोदी यांच्याबाबतही मनोज जरांगे पाटील यांनी मोठ विधान केल. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. तसेच ते बीड जिल्ह्याचा दौरा करत आहे. व ते स्थानिकांशी संवाद साधत आहे. तसेच आज त्यांनी बीडमध्ये बोलतांना राजकीय घडामोडींवर भाष्य केले. अनेक गुन्हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर दाखल होत आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. बुडत्याचे पाय डोहाकडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल. तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकायचे आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. आम्ही मागतोय ते आरक्षण द्या, माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या पण तसे होत नाही. तसेच ते म्हणाले की मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे असे म्हणत देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे यांनीजोरदार टीका केली. 
 
मनोज जरांगे पाटील यांनी मोफत नोकरी महोत्सवातही भाषण केलं. मराठा समाजाचे काम मी  करत आहे. जातीयवादी मी नाही. हे व्यासपीठ जनतेचं आहे. नोकरी विषयात जात आणायची नाही. काही टीम शासनाच्या योजना समजून सांगण्यासाठी तयार करा, हे राज्यभर करा. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं सर्व जातीतील लेकरांना यामुळे न्याय मिळेल. मी फक्त मराठा आरक्षण बद्दल बोलतो. मला जातीत तोलू नका, राजकारणी यांनी जातीय द्वेष पसरवला आहे. सावध होऊन आपण परिवर्तन केले पाहिजे. राजकारण्याकडे दारिद्र रेषेचे कार्ड कसे काय? तसेच जास्तीचा निधी मिळावा सर्व समाजाच्या महामंडळाना म्हणून प्रयत्न केले पाहिजे. बेरोजगार यांना आज सत्तर कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे. तसेच रोजगार उपलब्ध करून घ्यावा, असं मनोज जरांगे म्हणाले. एकदा पण केला की गोरगरीब मराठा समाज तो पूर्णच करतो. तुमचा पण पूर्ण तुम्हाला करायचा आहे. प्रसंगी मनोज जरांगे पाटील उद्घाटन प्रसंगी आयोजित नोकरी महोत्सवात उपस्थित होते. व तिथे ते बोलत होते. 

Edited By- Dhanashri Naik