रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (09:19 IST)

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुन्हा आदेश बांदेकर

अभिनेते तसेच सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. जगभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील दादरमध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा कारभार पुढील तीन वर्षे बांदेकर पुन्हा सांभाळणार आहेत.
 
छोट्या पडद्यावर भावोजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर गेली १६ वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.  त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भावोजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे.